
दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। फलटण । प.पू.आचार्य 108 आर्यनंदी मुनी महाराजांची 118 वी जयंती कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी अखिल दिगबंर जैन सैतवाल संस्थेचे जिल्हाध्यक्ष श्रीपाल जैन,सुभाष काका खडके, राजेंद्र सवळे, मंदिर समितीचे विश्वस्त उदयकाका शहा, राजेंद्र कोठारी (बुधकर), जैन सोशल ग्रुप संचालक तुषार शहा, सागर दोशी, पंडितजी महावीर उपाध्ये, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मनीषाताई नागावकर, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ.अपर्णाताई जैन, सौ. दर्शनाताई सवळे, सौ. सुरेखाताई उपाध्ये, सौ.सरिताताई खडके, सौ. पोर्णिमाताई शहा आदी मान्यवर उपस्थित होत्या.