पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मार्फत महिला कला महोत्सवाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । मुंबई । महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दिनांक ८ मार्च ते १२ मार्च या कालावधीत महिला कला महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मार्फत दरवर्षी ८ मार्चला महिला कला महोत्सवाचे आयोजन केले जात असते. महिलाविषयक प्रबोधन, माहितीपर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे या महोत्सवादरम्यान आयोजन करण्यात येते. यावर्षीही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून एकूण २४ कार्यक्रम सादर होणार आहेत. महोत्सवाची सुरुवात ८ मार्च रोजी होणार असून, या दिवशी मकरंद देशपांडे यांचे ‘सर प्रेमाचं काय करायचं’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. काव्य, नाट्य, मुलाखती, नृत्य, शास्त्रीय संगीत, लोककला, प्रबोधन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात असून; रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पास देऊन प्रवेश मिळवता येईल. या महोत्सवाचे पास पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे कार्यालयीन वेळेत मिळतील. कोविड विषयक नियमांचे पालन करून कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!