
स्थैर्य, मुंबई, दि. १५: ओझीवा हा भारतातील अग्रगण्य स्वच्छ, वनस्पती आधारीत पौष्टिक घटकांचा ब्रँड असून देशभरात आरोग्य आणि फिटनेस क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँडने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोनची ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली. सर्वात प्रतिभावान आणि यशस्वी अभिनेत्री असल्याने पदुकोन ही फिटनेस आणि मानसिक स्वास्थ्याबाबत समर्पणासाठी प्रसिद्ध आहे. ‘हर तरह से बेटर यू’ या ब्रँडच्या तत्त्वाशी या अभिनेत्रीचा स्वभाव समान असल्याने शारीरिक व मानसिक आरोग्याचे संतुलन साधण्याबद्दल ती नेहमी बोलत असते.
ओझीवाच्या सह संस्थापिका आरती गिल यांनी सांगितले की, ‘एक आरोग्यदायी, स्वस्थ आणि उत्कृष्ट आयु्ष्य स्वच्छ, वनस्पती आधारीत पोषक घटकांसमवेत जगण्यासाठी हजारो लोकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने आम्ही ओझीवाची आम्ही सुरुवात केली. एकूणच संपूर्ण आरोग्याकडे पाहण्याचा सर्वांगिण आणि उत्साही दृष्टीकोन तयार करण्याकरिता आम्हाला फिटनेसची पारंपरिक व्याख्या नव्याने करायची आहे. या प्रवासात ओझीवाच्या कुटुंबासोबत दीपिका पदुकोन आल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. हर प्रकारे अधिक उत्तमतेकडे मार्गक्रमण करण्याचे व याद्वारे एकूण शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्याचे आमचे तत्त्व असून ती आमच्या या ध्येयाशी समरस होऊ शकते.’
दीपिका पदुकोन म्हणाली ‘‘एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या कशी दिसते, यावरच फिटनेस अवलंबून नसते. याउलट, मन, शरीर आणि आत्म्याचे संतुलन साधणे म्हणजे फिटनेस. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या फिट असणे म्हत्त्वाचे. दररोज आणखी चांगले पर्याय निवडण्याने आपण आपोआपच आणखी चांगल्या स्वरुपात रुपांतरीत होत असतो. ओझीवाची उत्पादने आणि तत्त्वे याच विचारसरणीवर आधारीत आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी समरस होते.’
अमेरिकेतील क्लीन लेबल प्रोजेक्ट प्युरिटी अवॉर्ड आणि पेस्टीसाइड फ्री सर्टिफिकेट मिळवल्याने तसेच भारतातील पहिला प्रमाणित क्लीन ब्रँड घोषित झाल्याने ओझीवा नुकताच चर्चेत होता. जागतिक पातळीवर अशी प्रतिमा निर्माण करणे हा एका भारतीय ब्रँडच्या दृष्टीने मैलाचा दगड असून याद्वारे भारतात शुद्धतेच्या विश्वात एक आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रीय आरोग्य क्रांतीचा प्रसार करण्याच्या ओझीवाच्या पुढील टप्प्यात दीपिका पदुकोनसारखी महत्त्वाची व्यक्ती सहभागी झाल्याने, या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळेल.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					