मातृभूमी सेवा प्रतिष्ठान मार्फत दिवेकर हॉस्पिटलला ऑक्सिजन मशीन सुपूर्त


 

स्थैर्य, सातारा, दि. २३ : मातृभूमी सेवा प्रतिष्ठान सातारा ही सामाजिक सेवा संस्था साताऱ्यात कार्यरत आहे. अनेक सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठान मार्फत घेतले जातात. सध्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तूटवडा जाणवत असल्याने ऑक्सिजन concentrator देण्याचे ठरले. आम्ही सर्वांनी आपापल्या मित्रांना व परिचयातील लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले व त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

 

शाहूपुरी भागात 3 वर्षांपूर्वी डॉ. अजिंक्य दिवेकर यांनी दिवेकर  हॉस्पिटल सुरु केले आहे. अल्पावधीतच आई -वडिलांप्रमाणे  डॉ. अजिंक्य दिवेकर व त्यांच्या कर्मचारी वर्गाने आपल्या आपुलकीच्या वागणुकीने सर्वांना आपलेसे केले आहे. शाहूपुरी व सातारा शहरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन स्वतःचे हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. 

त्यामुळे आम्ही ऑक्सिजन मशीन दिवेकर हॉस्पिटलला देण्याचे ठरवले व ते आज आमच्या  प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. अजिंक्य दिवेकर यांना सुपूर्त केले. या ऑक्सिजन मशीनचा अतिशय चांगला उपयोग कोरोना रुग्णांना होईल असा विश्वास डॉ. अजिंक्य दिवेकर यांनी व्यक्त केला व सर्वांचे आभार मानले.

त्याच बरोबर कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांप्रमाणे सर्व औषध विक्रेते अतिशय चांगले काम करीत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष  प्रसाद पाटील यांचाही सत्कार ट्रॉफी देऊन डॉ. अजिंक्य दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास अत्रे यांनी दिली. त्या वेळी संस्थेचे मार्गदर्शक  मकरंद जोशी, उपाध्यक्ष प्रसाद पाटील, सचिव  दिनेश कुलकर्णी, संचालक सौ. ज्योती अत्रे, मंदार जोशी व रामदास बोराटे उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!