ऑक्सिजन पातळी खालावत होती, पण रुग्णवाहिकाच मिळाली नाही; पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पुणे, दि.२: टीव्ही ९ मराठीचे शहर प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास झाला. त्यानंतर डॉक्टरांकडे त्यांच्यावर उपचार सुरु होते. २७ ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर पुण्यातून ते आपल्या मूळ गावी कोपरगावला गेले.गावी गेल्यानंतरही पांडुरंग यांना त्रास झाल्यामुळे त्यांची पुन्हा अँन्टीझेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी ३० ऑगस्टला पांडुरंग रायकर यांना कोपरगावहून पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये पांडुरंग यांच्यावर उपचार सुरु होते.

मात्र परिस्थिती खालावत गेली. जम्बो हॉस्पिटलमधून खासगी हॉस्पिटलला शिफ्ट करण्यासाठी त्यांना कार्डिअक रुग्णवाहिकेची गरज होती. पण व्हेटिंलेटर खराब असल्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.रात्री उशिरापर्यंत स्थानिक पत्रकारांच्या मदतीने पांडुरंगला रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र त्यात यश आलं नाही. पांडुरंग यांची ऑक्सिजन पातळी खाली येत होती. पहाटे ५ च्या सुमारास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून रुग्णवाहिका उपलब्ध झाली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. कार्डिअक रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचेपर्यंत पांडुरंग रायकर यांची प्राणज्योत माळवली होती. वेळेवर रुग्णवाहिका आणि हॉस्पिटलला बेड मिळाला नसल्याने पांडुरंगचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!