
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : साताऱ्यासह राज्यभरातील खवय्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘देवत्व बेकर्स’च्या स्पेशल मावा केकची चव आता फलटणकरांनाही चाखायला मिळत आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शहरातील भक्ती एंटरप्रायजेस येथे या केकच्या विक्रीचा प्रारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी ३०० हून अधिक केकची विक्री करत फलटणकरांनी या ‘स्वादोत्सवा’ला उच्चांकी प्रतिसाद दिला.
साताऱ्यातील देवत्व बेकर्सचा ड्रायफ्रूटने समृद्ध, शुद्ध शाकाहारी मावा केक आपल्या चवीसाठी सर्वत्र ओळखला जातो. याच केकची मागणी फलटणमध्येही मोठ्या प्रमाणात होती. ही मागणी लक्षात घेऊन येथील भक्ती एंटरप्रायजेसने देवत्व बेकर्सच्या मावा केकसह व्हॅनिला बटर केक आणि चॉकलेट केक विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या उपक्रमाचे खवय्यांकडून जोरदार स्वागत होत आहे.
मावा केक सोबतच, साताऱ्यातील सुप्रसिद्ध ‘राजपुरोहित’ यांची नमकीन उत्पादनेही प्रथमच फलटणमध्ये विक्रीसाठी दाखल झाली आहेत. यामध्ये फरसाण, बाकरवडी, पोहा चिवडा, लसूण शेव यांसारख्या विविध पदार्थांचा समावेश असल्याने ऐन सणासुदीच्या काळात फलटणकरांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरली आहे.
हे दोन्ही प्रसिद्ध ब्रँड फलटणकरांच्या सेवेत आणल्याबद्दल भक्ती एंटरप्रायजेसचे प्रोप्रायटर, पत्रकार यशवंत खलाटे-पाटील यांनी समाधान व्यक्त केले. फलटणकरांचा प्रतिसाद अभूतपूर्व असून, यापुढेही सर्वोत्तम सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरातील कसबा पेठेतील राममंदिराशेजारी बुरुड गल्लीत हे शॉप सुरू झाले आहे.

