दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२१ । सातारा । केंद्र सरकार व राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षणाबाबत टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या दोन्ही सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सातारा जिल्हा ओबीसी संघटना व सातारा जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने आक्रोश आंदोलन आयोजित केलेले आहे. तरी या आंदोलनात ओबीसी बांधवांनी व भगिनी सहभागी व्हावे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा फायदा घेणारे ग्रामपंचायत सदस्य .पंचायत समितीचे सदस्य. सभापती .सरपंच. जिल्हा परिषद सदस्य यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे .पण हे कोणत्याही आंदोलनात सहभागी होत नाहीत .आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत .ओबीसी समाजासाठी काही काम करत नाहीत .तरी या राजकीय आरक्षण घेणार या लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावे अशी अपेक्षा सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. ओबीसीचे आरक्षण आत्ता टिकवले तरच ते टिकणार आहे नाहीतर ते कायमस्वरूपी जाणार आहे महाराष्ट्रभर समाज आंदोलन करतो आहे प्रत्येक ओबीसी ने याची दक्षता घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे असे निवेदन सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे यांनी केलेले आहे. तसेच सातारा जिल्हा ओबीसी महिला अध्यक्षा सुनीता लोहार यांनी केले आहे.