परप्रांतिय युवकाला साताऱ्यात मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२६ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा रेल्वे स्थानकासमोर एका परप्रांतिय युवकास चौघाजणांनी मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड मारुन त्याला जखमी केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हणमंत केली असे जखमी झालेल्याचे नाव असून गुन्हा दाखल झालेल्यापैकी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, हणमंत नडविन केरी (वय २१, रा. काकणकी, ता. जि. विजापूर, राज्य : कर्नाटक. सध्या रा. वाढे, ता. जि. सातारा) हा युवक सोमवारी दुपारी सातारा रेल्वे स्थानकाच्या समोर उभा होता. यावेळी तेथे मानकेश कटिमनी, रोहित कैलास पवार आणि त्यांचे दोन अनोळखी मित्र (सर्व रा. वाढे, ता. जि. सातारा) आले आणि त्यांनी ‘बहिणीला त्रास का देतो,’ असे म्हणून मारहाण केली. रोहित पवार याने हणमंतच्या डोक्यात दगड मारला. यात तो जखमी झाला. याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर मानकेश, रोहित पवार आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!