दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२१ । माण । माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखला करण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जागेसाठी 102 इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी झालेल्या अर्ज छाननीत 2 बाद तर 100 अर्ज वैध ठरले. हमाल मापाडीचा एकच सदस्य असल्यानेही या जागेसाठी एकमेव अर्ज दाखल केला. मात्र, सुचक व अनुमोदक म्हणून सदस्य सोसायटी मतदार संघातील सदस्यांनी उमेदवारी अर्जावर सही केल्याने निवडणूक अधिकारी विजया बाबर यांनी तो अर्ज बाद केला होता. त्यानंतर हमाल मापाडीचे उमेदवार यांनी सातारा जिल्हा उपनिबंधक यांचेकडे अपिल दाखल केला. याचा निर्णय होणार काय होणार याकडे लक्ष लागून राहिले असून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार घेणार व कोण रिंगणात उतरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
माण बाजार समितीचे 18 कारभारी 2065 मतदार ठरवण्यासाठी काल 102 उमेदवार अर्ज दाखल झाले. सोसायटी मतदार संघातून 895 मतदार 11 संचालक निवडून देणार आहेत. त्यातील सात जागा खुल्या प्रवर्गासाठी, दोन जागा महिलांसाठी, इतर मागास प्रवर्ग साठी एक तर विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी एक जागा आरक्षित आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून 835 मतदार 4 संचालक निवडून देणार आहेत. व्यापारी व आडते मतदार संघातून 334 मतदार 2 संचालक निवडून देणार आहेत. हमाल तोलारी मतदार संघातून एक संचालक निवडून द्यावयाचा असून त्यासाठी फक्त एकच मतदार आहे. त्या एका मतदाराने आपले दोन अर्ज दाखल केले. त्या उमेदवार अर्जावर सुचक व अनुमोदक म्हणून सोसायटी मतदार संघातील मतदारांनी सह्या केल्याने आज छावणीत तो अर्ज बाद करण्यावरुन उमेदवाराने सातारा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून सायंकाळी उशिर यावर तातडीच्या न्यायालयात निकाल होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.