मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी आपले राज्यकर्ते कमी पडतात – प्रा.डॉ.सतीश तराळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ जानेवारी २०२३ । सातारा । ‘’ युनेस्कोने सांगितले होते की २०२० पर्यंत मराठी भाषा नष्ट होईल, ती नष्ट झालेली नाही. उत्तम कांबळे यांच्या लेखात बोली मरत आहेत हे विधान करण्यात आहे. आज अनेक भाषा नष्ट होत आहेत. एका अहवालात असे म्हटलेय की इ.स,२३०० अखेर जागतिकीकरणात केवळ इंग्रजी भाषा ही जगात असेल.या सर्व पार्श्वभूमीवर आपली मातृभाषा मराठी आहे ती जगली व जगवली पाहिजे म्हणून आता आपण मराठी भाषा पंधरवडा सुरु केला आहे.सध्या जगात दोन समस्या असून जागतिकीकरणाची आणि दह्शतवादाची समस्या आहे. काही मल्टी नॅशनल कंपन्यांना जगावर वर्चस्व निर्माण करायचे आहे. आज ५६ देशात इस्लाम आहे. काही इस्लामी दहशतवादी यांना जगावर इस्लामिक राज्य आणायचे आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे.या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मधुकर वाकोडे,सतीश काळसेकर व रंगनाथ पठारे या तीन माणसांची समिती नेमली होती. तिने ८४ पानांचा अहवाल तयार केला. अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी
मराठी भाषेला २००० वर्षाचा इतिहास असल्याचे पुरावे देऊन त्यांनी सिद्ध केले आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारचे काही निकष आहेत. ती भाषा प्राचीन असावी. मौल्यवान असली पाहिजे,सलग असली पाहिजे, भाषिक आणि वाड्मयीन दृष्टीने ती स्वयंभू असली पाहिजे ,प्राचीन आणि आधुनिक रूपे यात सलग्नता असली पाहिजे हे अभिजात भाषेचे निकष आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास केंद्र सरकारचे ५०० कोटी व राज्य सरकारचे ५०० कोटी आपल्याला मिळतील त्यातून भाषा विकासासाठी वाढीसाठीचे अनेक उपक्रम सुरु करता येतील. मराठी भाषला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात महाराष्ट्रीय राज्यकर्ते कमी पडतात अशी खंत अमरावती येथील जेष्ठ साहित्यिक डॉ.सतीश तराळ यांनी व्यक्ती केली. ते सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या,रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये मराठी विभाग,कमवा आणि शिका विभाग व एन.सी.सी. विभागाने आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ‘मराठी भाषा संवर्धन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख हे उपस्थित होते. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे ,लेफ्टनंट प्रा.के.एल.पवार ,प्रा.राहुल वराडे पाटील व विद्यार्थी परिषदेची सचिव साक्षी घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
यापूर्वी भारतातील ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यांच्या संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले.’’पी.व्ही.नरसिंहराव दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांना मेजोरिटी नव्हती ,त्यावेळी दक्षिणेकडील राज्यांनी पाठिंबा देतो म्हणून काही अटी घातल्या त्यात आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी होती, त्यांनी ती मान्य केलेली आहे. त्यातूनच कन्नड ,तेलगु ,उडीसा ,तमिळ यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मात्र आपले राज्यकर्ते मराठी भाषेला हा दर्जा मिळावा म्हणून भरीव प्रयत्न करीत नाहीत. संस्कृत पासून मराठी भाषा निर्माण झाली ही गैरसमजूत आहे. संस्कृत भाषा अभिजनांची भाषा आहे ती बहुजनांना शिकवली जात नव्हती. उलट बहुजन भाषा ही व्यापक आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली,तुकारामांनी गाथा लिहिली. हे सर्व लेखन मराठी भाषेत केले आहे, सर्व सामान्याना बोली भाषेत ज्ञान देण्याचा प्रयत्न केले आहेत. लीळाचरित्र बोलीभाषेतले मराठीतले पहिले चरित्र आहे. चक्रधर आणि महात्मा गांधी हे गुजरात मधून आलेले असले तरी ते बहुजनाच्या साठी काम केले. विचाराच्या पातळीवर हिंदू धर्म चांगला असला तरी आचाराच्या पातळीवर मानवता जाणवलेली नाही, त्यामुळे अनेक पंथ झाले. चक्रधरांनी धर्मज्ञान मराठी बोली भाषेतच द्या असे सांगितले होते. अमरावती जिल्ह्यातली ती बोली भाषा आहे. बोली बाबतीत कधीही न्यूनगंड बाळगू नये. मराठी भाषेच्या उगमकाळी मराठी ग्रंथ विपुल वाड्मय तयार
झाले आहे. त्यावेळी संस्कृत पंडित असूनही जनसामान्याच्या भाषेत लेखन झाले आहे. मराठीतील पहिली कविता ही महदंबेने केली. काव्यगुणाच्या दृष्टीने तुकारामाचे साहित्य खूप समृद्ध आहे. संत एकनाथांनी भारुडे लिहिली .व्यवहार बोधाच्या दृष्टीने रामदासी काव्य महत्वाचे आहे. केशवसुत यांच्या तीस वर्षे आधी सावित्रीबाई फुले यांनी आधुनिक कविता लिहिली. त्याच आधुनिक मराठी कवितेच्या जनक आहेत. गझल हा उर्दूतला प्रकार सुरेश भटांनी लोकप्रिय केला.डॉ.आंबेडकरांच्या प्रेरणेने तयार झालेलेले विद्रोही साहित्य हे माणुसकीसाठीचे काव्य आहे. मराठी प्रमाणभाषा ही पुण्यातील कोकणी ब्राह्मण प्रतिनिधी बोली असून ती सार्वत्रिक महाराष्ट्राची बोली होऊ शकत नाही. मराठीच्या बाबतीत त्यामुळे आपण कच्चे आहोत. अनेक मुले मराठीत नापास होत आहेत. मराठी भाषा ही बहुजनांच्या
शोषणाचे हत्यार म्हणून वापरली गेली आहे. प्रमाण मराठी भाषा ही तुमची माझी बोली नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मराठी दिन कुसुमाग्रज यांच्या नावे होतो,खरे तर ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचे काव्य समृद्ध असूनही त्यांच्या नावे मराठी दिन का नाही ? भाषेच्या राजकारणाचा कावा समजून घेतली पाहिजे .प्रमाण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ नये असे डॉ.आ.ह.साळुंखे म्हणतात की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नको. बहुजनांची मराठी बोली भाषा एकत्र येत मराठी वाढली पाहिजे. बोली ह्याच आमच्या मातृभाषा आहेत. जनसामान्याची भाषा प्रमाणभाषा व्हायला हवी/ तीच अभिजात भाषा व्हावी. मराठीतून इंजिनियर ,वकील ,डॉक्टर
व्हायला हवेत .मराठी ही ज्ञानभाषा व्हायला हवी असे मत त्यांनी यावेळी एक जगातील १०००० भाषांमध्ये मराठीचे स्थान ११ व्या क्रमांकावर आहे. मराठी देवनागरी लिपी ही सुलभ नाही अशी खंत आहे. ती सदोष लिपी आहे. मोडी सारखी ५०० वर्षे मराठीची लिपी असूनही देवनागरी ही भाषा लिपी केली हे चांगले झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात मराठीतील पाळणे ,मंगल अष्टके ,भीम गीते डॉ.रामराजे मानेदेशमुख यांनी गाऊन दाखवले.

प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.’गे माय भू तुझे व मी फेडीन पांग सारे’ ही कविता त्यांनी सादर केली. आभार प्रा. श्रीकांत भोकरे यांनी मानले तर सूत्र संचालन सोनाली जाधव व समीक्षा चव्हाण या विद्यार्थिनीनी केले. या समारंभास डॉ.कांचन नलवडे, प्रा. प्रियांका कुंभार व विद्यार्थी प्राध्यापक मोठ्या संख्येने हजर होते.


Back to top button
Don`t copy text!