दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण नगरपरिषदेने जानेवारी महिन्या पासून पाणी पुरवठा व इतर विभागाची लाईट बिले थकवली होती. यापुर्वी सुध्दा अशीच लाईट कट करण्यात आलेली होती. ह्यावेळी सुध्दा तब्बल 36 लाख बिल आजअखेर थकलेले होते. आम्ही आवाज उठवल्यानंतरच आमच्या दणक्यानेच लाईटबिले भरण्यात आली, असे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना अशोकराव जाधव म्हणाले की, सध्या फलटण शहर हे मुख्याधिकारी यांच्याकडे प्रशासनाच्या नात्याने आहे. तरी मुख्याधिकार्यांनी जनतेच्या डोळ्यांमध्ये धुळफेक करू नये. प्रशासक या नात्याने फलटण शहर हे सध्या तुमच्या भरोष्यावर आहे. तुम्हीच चुकीच्या पद्धतीने वागू नका, अन्यथा आम्हाला लोकशाही पद्धतीने तुम्हाला जाब विचारावा लागेल.