
स्थैर्य, वडूज, दि. १७ : वडूज नगरपंचायतीला साडे चार वर्षे पूर्ण झाली असून नगरपंचायत वडूज शहराचा विस्तार होत आहे. नगरपंचायतीने कर प्रणाली मोठी वाढ केली आहे.परंतु नको त्या विकास कामामध्ये नगरपंचायतीच्या तिजोरी खाली करत आहे.सध्या वडूज शहरात दोन पाण्याच्या टाक्यांमध्ये मुबलक पाणी असताना देखील केवळ ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरिकांना चार ते पाच दिवसातून पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.यावर एका महिन्याच्या आत तातडीने उपाय योजना न झाल्यास नगरपंचायतीवर मोर्चा काढून शिमगा आंदोलन करण्याबरोबर नगरपंचायतीचे कामकाज बंद पाडू असा इशारा शहाजीराजे गोडसे मित्र मंडळतर्फे मुख्यधिकरी माधव खांडेकर याना निवेदन देऊन देण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की,नगरपंचायत विस्तार झाला आहे त्याचबरोबर नगरपंचायत कर तसेच 14 वित्त,15 वित्त, न.प. फंड यातून नगरपंचायत तीजोरी मध्ये वार्षिक 7 ते 8 कोटी रुपये जमा होत असताना सुद्धा नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नगरपंचायत वडूज व सत्ताधारी असमर्थ ठरले आहेत. सत्ताधारी नगरसेवक यांच्याकडे कोणतेही नियोजन नाही किंवा कोणताही आराखडा तयार नाही. नियोजन शून्य कारभार यामुळे वडूज ची विकासाची गती मंदावली आहे. याला हे सत्ताधारी जबाबदार आहेत.
काळे वस्ती (रानमळा), शिवाजी नगर, पवार वस्ती, भवानी माळ या भागात अजून पाणीपुरवठा चे तीन-तेरा वाजले आहेत. राहिलेल्या भागात पाणी हे चार-पाच दिवसातून एकदा येत आहे. हे पाणी प्रश्न अनेक वेळा नगरपंचायत मीटिंग मध्ये आम्ही मांडले असून पाणी या उपाययोजने वरती खर्च करायचा सोडून सत्ताधारी जी कामे तयार आहेत. ती कामे उकरून स्वतःचा खिसा भरण्यात धन्यता मानत असून मी काही तरी काम केले आहे असे भासवून स्वतः ची पाठ थोपटून घेत आहेत.पण त्याना वडूजच्या पाणी प्रश्न चा विसर पडला आहे.
परंतु येणाऱ्या एक महिन्याच्या आत जर वडुजचा पाणी प्रश्न जर सुटला नाही , तर वडुजच्या जनतेला घेऊन भव्य मोर्चा काढून नगरपंचायत कार्यालय व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सत्ताधारी नगरसेवक यांच्या घरापुढे शिमगा आंदोलन करू व नगरपंचायतीचा कारभार बंद पाडू.यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विजय दादा शिंदे,आबासाहेब भोसले, मधुकर मोहिते, सुशांत पार्लेकर उपस्थित होते.