….अन्यथा मंगळवारपासून ऊस तोडी बेमुदत बंद


स्थैर्य, सातारा, दि. 11 नोव्हेंबर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सर्व नियम न धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप सुरू करून ऊस उत्पादक 5. शेतकर्‍यांची चेष्टा केली आहे, असा स्फोटक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेळके यांनी केला आहे. साखर सम्राटांच्या बगलबच्च्यांनी ऊसदर – न ठरवता गाळप चालू करून शेतकर्‍यांच्या अन्नात माती घातली आहे. आम्ही किती वफादार – आहोत हे दाखवण्यासाठी ते कारखानदारांच्या दारात शेपूटहलवत आहेत, असा संतप्त आरोप त्यांनी करत प्रशासनालाही धारेवर धरले आहे.
11 नोव्हेंबरपर्यंत प्रति टन 3751/- बिनाकपात ऊसदर जाहीर करा, अन्यथा 12 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व ऊस तोडी पूर्णपणे बंद केली जाईल! या वेळी ऊसदरावर कुठलीही तडजोड होणार नाही. आस्मानी संकट, उत्पादन खर्च आणि शेतकर्‍यांचा घाम याचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय ऊस तोडणार नाही! असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
काही कारखानदारांनी साखरगाळप परवाना न घेता ऊस तोड सुरू केली आहे. काटामारी, रिकव्हरी चोरी, एफआरपीचे तुकडे करून दर ठरवणे ही ’खूली लुट’ खुलेआम सुरू आहे. आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन या साखर सम्राटांना पाठिशी घालत आहे!
साखर संकुल व साखर आयुक्त कार्यालय हे शेतकर्‍यांच्या हितासाठी असावे, पण ते आज कारखानदारांचे बाहुले बनले आहेत. लाखो रुपयांचे पगार साखर घेणारे अधिकारी कारखानदारांच्या दरबारी उभे आहेत, असा टोला स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे. 11 तारखेपर्यंत दर जाहीर न झाल्यास कोणीही ऊस तोड घेऊ नये! जर कोणी गद्दारी केली, तर नुकसान झाल्यास रडू नका. स्वाभिमानी कार्यकर्ते तुमच्यासाठी जिवाचे रान करत आहेत, आणि तुम्हीच जर पहिला ऊस घालवला, तर साखर सम्राटांना बळ मिळेल! आज कोल्हापूर-सांगलीचे शेतकरी लढा देऊन दर मिळवतात, आणि तुम्ही घरबसल्या दराची अपेक्षा करता -हे थांबवावे लागेल. आता लढा द्यावाच लागेल! असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!