दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । फलटण । फलटण शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करून व जप्त केल्यामुळे काही वाहने उभे आहेत. सदरची वाहनांबद्दल कोणीही मालकी हक्क सिद्ध केलेला नाही. त्या मुळे फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये ३४ बेवारस वाहने उभी आहेत. त्या बाबत सविस्तर माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये उपलब्द आहे. तरी सदरील बेवारस वाहनांची मालकांनी मूळ कागतपत्रांसहित ओळख पटवून आपली वाहने ताब्यात घ्यावीत. दि. ३१ जुलै २०२१ नंतर कोणीही सदरील वाहनांवर हक्क दाखवल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर सदरील वाहनांची आवश्यक ती कार्यवाही करून वाहनांचा स्क्रॅप म्हणून कायदेशीर लिलाव करण्यात येईल, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.