पांडुरंग गुंजवटे यांचा आदर्श इतरांनी घ्यावा : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १२: माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. लॉकडाऊन दरम्यान सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. यात आपण सर्वांनीच एकमेकाना आधार देणे गरजेचे असल्याचे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ४ व ५ मधील तब्बल १५७० कुटुंबांना या कडक लॉकडाऊनमध्ये पुरेल इतपत अन्नधान्याचे किट माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी दिले आहे. याचे वाटप आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

यावेळी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, सुरेश पवार, किशोर नाईक निंबाळकर, राहुल निंबाळकर, दीपक कुंभार, डॉ. विलास इंगळे, रवींद्र माने, प्रकाश भोसले, अभिजित भोसले, योगेश कापसे, आशुतोष थोरात, मयूर गुंजवटे, शंकर गुंजवटे, शुभम महाजन, वीरेंद्र गुंजवटे, महादेव कुंभार, दिगंबर कुंभार, नंदकुमार कुंभार, विशाल राहिगुडे, राहुल राहिगुडे, शिवाजी जुवेकर, विलास मोरे, गणेश घाडगे, सुरेश घाडगे, शुभम थोरात यांची उपस्थिती होती.

गुंजवटे यांनी प्रभाग क्र.४ व ५ मधील १५७० कुटुंबांना ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, २ किलो पोहे, १ किलो शेंगदाणा, २ किलो साखर, १ लिटर तेल, १ किलो कांदा लसूण चटणी असे ८ प्रकारच्या अन्नधान्यातील उपयोगी किराणामालाचे किट देण्याचे येत आहे.


Back to top button
Don`t copy text!