ओरिगो २० दशलक्ष डॉलरचा निधी उभारणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑक्टोबर २०२१ । मुंबई । अभारतातील आघाडीची कृषी फिनटेक कंपनी ओरिगो कमोडिटीज यूएस सरकारची डेव्हलपमेंट फायनॅन्स संस्था, यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनॅन्स कॉर्पोरेशन (डीएफसी)कडून २० दशलक्ष डॉलर (१४५ कोटी रु.) डेट फंड उभारणार आहे.

कृषी संबंधित सर्व हितधारकांसाठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या रूपात शेतकर्‍यांना आणि व्यापार्‍यांना खरेदी, संग्रह साहाय्य आणि ट्रेड फायनॅन्स उपलब्ध करून देण्याचा ओरिगोचा उद्देश आहे. गुरुग्राम स्थित ही कंपनी या नवीन भांडवलाचा उपयोग छोट्या आणि मध्यम श्रेणीच्या कृषी उत्पादकांची आणि व्यापा-यांची क्षमता वाढवण्यासाठी करेल आणि त्यांना कोव्हिड-१९ महामारीच्या उद्रेकामुळे सोसाव्या लागणार्‍या समस्यांमधून बाहेर येण्यास मदत करेल. ओरिगो एसएमईज बरोबर देखील काम करेल आणि त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी खरेदी साहाय्य आणि फायनान्सिंग देईल.

ओरिगो कमोडिटीजचे सह-संस्थापक सुनूर कौल म्हणाले, “ओरिगोमध्ये आम्ही आमच्या कृषी-फिनटेक मंचाच्या मदतीने भारतीय कृषी कमोडिटी क्षेत्राच्या परिणामकारकतेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कमोडिटीज खूप जटिल असतात आणि आमचा प्रयत्न नेहमी त्यांच्या बाबतीतली समज आणि सहभाग सुधारण्याचा असतो. डीएफसीशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे आणि आम्हाला आशा आहे की, नवीन भांडवलामुळे भारतातील कृषी क्षेत्राला लाभ होईल. त्याच्यामुळे एसएमई व्यापारात मदत होईल, खाद्य पदार्थांचा अपव्यय टाळता येऊ शकेल आणि उपभोग आणि खाद्य सुरक्षेसाठी कामोडिटी उभारता येईल. महामारीने ग्रासलेल्या या क्षेत्राला मजबुती देण्यासाठी या पैशाचा उपयोग करून आम्ही हे सुनिश्चित करू की त्या क्षेत्राला त्याची खरी क्षमता प्राप्त होईल.”


Back to top button
Don`t copy text!