स्थैर्य, मुंबई, दि. २८ : पृथ्वीवरील पाणीसाठ्यांचे संरक्षण हे ओरिफ्लेमच्या तत्त्वज्ञानाचे प्रमुख केंद्र आहे. ओरिफ्लेमच्या स्क्रबमध्ये १०० % नैसर्गिक घटक वापरले जातात. याच वचनबद्धतेचा भाग म्हणून, ब्रँडने लव्ह नेचर ऑरगॅनिक अॅप्रिकॉट व ऑरेंज श्रेणी सादर केली आहे. या श्रेणीत एनर्जायझिंग क्लीनझर, रेडियन्स टोनर आणि रेडियन्स फेस जेलचा समावेश आहे. लव्ह नेचरची ऑरगॅनिक अॅप्रीकॉट आणि ऑरेंजसह एनर्जायझिंग क्लीनझर हे कमी फेस करणारे, स्वच्छता करणारे जेल असून ते अतिरिक्त घाण आणि किटाणू नष्ट करते. तसेच तुमची त्वचा अधिक ताजी, प्रफुल्लित आणि तेजस्वी दिसण्यासाठी त्यावरील छिद्रांचा दृश्यपणा कमी करते. आहे. केवळ नैसर्गिक घटकच नव्हे तर ब्रँडने या श्रेणीत आणखी मोठे पाऊल टाकत, अतिशुद्ध, नैसर्गिक घटकांचा वापर केला आहे.
लव्ह नेचर रिन्स-ऑफ उत्पादने विचारपूर्वक बायोडिग्रेडेबल अशीच तयार केली आहेत. ती सिलिकॉन मुक्त असून नैसर्गिकरित्या जीवाणू किंवा इतर सजीव प्रणालीमार्फत त्याचे विघटन होऊ शकते. त्यामुळे आता तुम्ही बिनधास्तपणे स्वच्छता करू शकता. कारण ही उत्पादने वापरताना वातावरणावर खूप कमीत कमी परिणाम होतो. लव्ह नेचर रेडियन्स फेस जेल हे युनिक, सेन्सोरियल फेस जेल असून त्यात नैसर्गिक जर्दाळू आणि संत्र्याचा अर्क आहे. यामुळे तारुण्याची चमक अधिक स्पष्ट दिसते. तसेच ताजी, उत्साही आणि तेजस्वी दिसणारी व रेशमी-मुलायम स्पर्शाचा अनुभव देणाऱ्या त्वचेसाठी योग्य हायड्रेशन पुरवते.
ओरिफ्लेम साऊथ एशियाचे रिजनल मार्केटिंग, सिनियर डायरेक्टर नवीन आनंद म्हणाले, “ आपले जग येथील रहिवाश्यांसाठी आणखी सुंदर करण्यासाठी नवे पाऊल उचलताना आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रत्येकालाच आमचे फॉर्म्युलेशन आवडेल, अशी आमची खात्री आहे. तसेच सर्वांसाठी लाभकारक बदल करण्यासाठी ते योगदान देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”