बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । सातारा । बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत दि. 18 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच  दि. 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या  एकात्मिक बाल विकास सेवा योजने मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) रोहिणी ढवळे यांनी दिली.

दि. 18 जानेवारी 2023 रोजी बेटी बचाओ-बेटी पढाओ शपथ कार्यक्रम. दि. 19 जानेवारी लिंगगुणोत्तर, मुलांचे संरक्षण आणि मुलींमध्ये कौशल्य विकास इ. विषयाच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा/ महिला ग्रामसभांचे आयोजन करणे. दि. 20 जानेवारी रोजी शासकीय-खाजगी शाळांमधून मुलींमध्ये खेळांना प्रात्साहन देण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम घेणे व समाज कल्याण आणि सामुदायिक मोबिलायझेशन या विषयावर शाळेमध्ये पोस्टर, स्लोगन-लेखन, चित्रकला, वॉल पेंटींग स्पर्धांचे आयोजन करणे. दि. 23 जानेवारी रोजी बालविवाह प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने धार्मिक, सामुदायिक नेत्यांसह बीबीबीपी (BBBP) जाणीव जागृती कार्यकमावर सुमदायाच्या बैठका आयोजित करणे व टॉक शो -आरोग्य आणि पोषण, कायदेशीर – गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदा (PC&PNDT)  आणि एमटीपी  (MTP) कायदा  आणि इतर महिला संबंधित कायदे याबाबत आयोजन करणे. दि. 24 जानेवारी 2023 रोजी समारोप समारंभ. क्रीडा, शिक्षण,समाज कल्याण, समुदाय एकत्रीकरण या क्षेत्रातील स्थानिक चॅम्पियन मुलींचा जिल्हास्तरीय सत्कार, बीबीबीपी (BBBP) स्थानिक चॅम्पियन्सबद्दल स्थानिक माध्यमांमध्ये कथा प्रसारित करणे व वृक्षारोपण.


Back to top button
Don`t copy text!