
दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । फलटण । प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी दिली.
बुधवार 29 जून रोजी स्वामी विवेकानंद नगर येथे सकाळी दहा वाजता निवास स्थान फलकाचे अनावरण समारंभ सद्गुरु व महाराजा उद्योगसमूहाचे संस्थापक मा. श्री. दिलीपसिंह भोसले यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध वक्ते प्राचार्य श्रीधर साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता श्री .सद्गुरू शैक्षणिक संकुल येथे प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली चा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास प्रमुख वक्ते मा. प्राचार्य श्रीधर साळुंखे ,महाराजा व सद्गुरु उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. दिलीपसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य श्री. रवींद्र बेडकिहाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून व श्री. सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या सचिव मा.अॅड.सौ.मधुबाला भोसले उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यावर प्रेम करणारया उपस्थित राहावे असे आवाहन महाराजा मल्टीस्टेट चे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केले.