राज्यस्तरीय काव्य व निबंध स्पर्धेचे आयोजन


स्थैर्य, फलटण : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माणगंगा साहित्य परिषद (पांगरी, ता. माण), सेवाभावी फाऊंडेशन (फलटण) व ज्ञानदिप शिक्षण संस्था (मांडावे, ता. माळशिरस) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन काव्य व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती संयोजक ताराचंद्र आवळे, समन्वयक प्रा.सौ.सुरेखा आवळे व प्राचार्य सी.डी.ढोबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 

काव्य व निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले काव्य व निबंध 8275371322 या व्हाट्सअँप क्रमांकावर व tarachandraawale@gmail.com या ई-मेल आयईडी दद्वारे सेंड कराव्यात. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम तीन क्रमांकास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व कोरोना किट देऊन सन्मानित केले जाईल. शंभर कवितांचा ‘जन्मशताब्दी’ हा संपादित काव्यसंग्रह या वेळी प्रसिद्ध केला जाईल. त्यामध्ये निवडक निबंधांचा समावेश केलेला असेल, असेही संयोजक ताराचंद्र आवळे यांनी स्पष्ट केले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!