खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रांतर्गत शुटींग, सायकलिंग व मैदाना खेळाच्या निवडचाचणीचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । सातारा । राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे राज्य निपुणता केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत 30 ते 31 मे 2022 या कालावधीत शुटींग, सायकलिंग व मैदानी खेळाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीमध्ये राज्यस्तरावर प्राविण्य व राष्ट्रीयस्तरावर सहभाग व प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना सहभाग घेता येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी कळविले आहे.

सातारा जिल्ह्यातील शुटींग, सायकलिंग व मैदानी खेळामध्ये प्राविण्य व राष्ट्रीयस्तरावर सहभाग व प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी आपले अर्ज, प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत जोडून दि. 23 मे 2022 पर्यंत [email protected] या ई-मेल आयडीवर सादर करावा, असेही आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!