दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२२ । सातारा । नावीन्यपूर्ण कल्पनांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिस्को लाँचपॅडच्या सहकार्याने टेक्नोप्रेन्योरशिप मालिकेच्या महाराष्ट्र आवृत्तीचे आयोजन करत आहे. त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात तरुण विद्यार्थ्यांसाठी स्टार्टप-अप, व्यवसाय व उद्योजकांसाठी ज्ञान सत्र उद्योग आणि पर्यावरणातील तज्ञांद्वारे दि.25 एप्रिल ते 29 एप्रिल 2022 व 2 मे ते 6 मे 2022 या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.
या उपक्रमाद्वारे नवोदित आणि उद्योजकांना त्यांची कल्पना कशी तयार करावी, टिकवुन ठेवावी, विस्तारित व्हावे आणि मोठे कसे करावे याचे ज्ञान दिले जाणार आहे.
तरी उत्सुक उद्योजक, विद्यार्थी आणि सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्ट-अपचे संस्थापक यांनी अर्ज करावे तसेच या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी स्टार्ट-अप आणि ईकोसिस्टमबद्दल माहिती मिळवण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. अर्ज करण्यासाठी http://cs.co/CLAPMaharashtra ह्यावर भेट द्यावी. प्रश्नांसाठी [email protected] ह्यावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.