
दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२१ । सातारा । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्या मार्फत दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
या मेळाव्यात डिप्लोमा इंजिनिअर, कॉम्प्युटर ऑपरेटर, पीपीओ, ग्रांईडर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनस्ट, टर्नर, 10 वी पास व नापास, आयटीआय, कुशल/ अर्धकुशल कामगार अशा प्रकारची 423 रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी सदरच्या संकेतस्थळावर नोंदणी पुर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करुन मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन द्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनीवर अथवा satararojgar1@gmail.com या ई मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.