दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । भारतीय स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवा निमित्त माझी वसुंधरा ,माझी जबाबदारी व स्वच्छ समृद्ध गाव या घोषवाक्याखाली महाविद्यालया च्या राष्टीय सेवा योजनाच्या वतीने राज्यस्तरीय व विद्यापीठ स्तरीय शिबिराचे आयोजन दि २४ मे ते २ जून २०२२ या कालावधीत जावली ता. फलटण या ठिकाणी करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
सदर शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठ कार्य क्षेत्रातील ३०० आजी स्वयंसेवक व १५० महाराष्ट्रतील माजी स्वयंसेवक राज्यस्तरीय शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. मदन पाडवी यांनी दिली.
सदर शिबिरामध्ये जावली ता. फलटण या गावामध्ये जनजागृती करण्यात येणार असून जावली येथे करावयाच्या पंधरा लाख वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात येणार असून शिबिराच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ,फलटण एज्युकेशन सोसायटी कै. श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान फलटण, क्रेडाई फलटण, गोविंद फौंडेशन, फलटण, कृषी विकास प्रतिष्ठान बारामती, माउली प्रतिष्ठान, काळबादेवी, मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने हे शिबीर पार पाडणार आहे.
शिबिराच्या उद्घाटनासाठी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एच. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कुलसचिव डॉ. व्ही. एम. शिंदे हे वृक्षमित्र म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यापीठाचे रा. से. यो. संचालक प्राचार्य अभय जायभाय यांच्या हस्ते श्रस्तपूजन करून पर्यावरण ज्योत प्रज्वलित केली जाईल.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
शिबिराच्या दहा दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्र शासन वन विभाग, गोविंद फौंडेशन फलटण, सॅटेलाईट रोटरी इंटरनॅशनल क्लब फलटण, कृषी विकास प्रतिष्ठान बारामती, फलटण व माण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचे मार्गदर्शन ग्रामस्थ व शिबिरार्थींना होणार असून प्रभात फेरी, पर्यावरण जागृती ज्योत, माजी स्वयंसेवक महामेळावा, प्लास्टिक मुक्त गाव, आगपेटी मुक्त शिवार, वणवा बंदी, मुक्त संचार गोठा पद्धती, दुग्धोत्पादन, महिला बचत मेळावा, हळदी कुंकू समारंभ, उखाणे स्पर्धा व रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शिबिराच्या सामारोपनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजाराम गुरव, संचालक विद्यार्थी कल्याण विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व फलटण तालुक्याचे आमदार दीपक चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत.
शिबीर समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सुधीर इंगळे तर सह संयोजक म्हणून प्रा. मदन पाडवी, प्रा. संतोष कोकरे, प्रा. डॉ. सौ. सविता नाईक निंबाळकर, प्रा. प्रकाश निंबाळकर, प्रा. लक्ष्मण राख हे काम करणार असून विविध महाविद्यालयाच्या स्वयंसेवक, स्वयंसेवकांनी शिबिरासाठी उपस्थित रहावे, असे आव्हान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.