दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । सातारा । सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सहकार्याने व ज्येष्ठ नागरिक संघ सातारा यांच्यावतीने गुरुवार दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी चार क्षण वाजता सातारा येथे विधी सेवा प्राधिकरणाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या अनुषंगाने असलेले योजनांची माहिती तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार आणि मृत्युपत्र काळाची गरज यासंदर्भात व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष सुजित शेख व विजय मांडके यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या श्री.छ. प्रतापसिंह महाराज उद्यानातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती वैदेही देव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी एडवोकेट सुधीर गोवेकर आणि एडवोकेट शरद शिंदे यांची व्याख्याने होणार आहेत.
महत्त्वपूर्ण अशा या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना विषयाचे जिल्हा प्रशासनाचे नियम पाळून उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्ष भिकाजीराव सूर्यवंशी , खजिनदार मदन देवी आणि सहकार्यवाह अशोक कानेटकर यांनी केले आहे.