दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । सातारा । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व शासकीय तांत्रिक विद्यालय तथा औद्योगिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जून 2022 रोजी शासकीय तांत्रिक विद्यालय तथा औद्योगिक शाळा, सातारा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सुनिल पवार यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.