
दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२५ | सातारा | पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत गुरुवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनता दरबाराला जिल्ह्यातील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहे. तरी नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घेऊन प्रलंबित प्रश्न असतील ते जनता दरबारात मांडाव्यात.