सर्वांगीण अध्ययन अनुभवासाठी ‘इन्फिनिटी लर्न फेस्टिवल’चे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । मुंबई ।  वेगाने वाढणारा एडटेक ब्रॅण्ड इन्फिनिटी लर्न आपल्या कामाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, आता चांगले अध्ययन प्राप्त करण्याच्या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत परवडण्याजोग्या दरात विस्तार करत आहे. यात विद्यार्थ्यांना केवळ उपलब्धता व परवडण्याजोग्या दरांचाच अनुभव मिळणार नाही, तर ते आता ‘इन्फिनिटी लर्न फेस्टिवल’च्या माध्यमातून केवळ २४९ रुपयांत हा प्लॅटफॉर्म वापरू शकतील. एखाद्या अभ्यासक्रमासाठी पैसे भरण्याची हमी देण्यापूर्वी आणि प्रत्यक्ष अध्ययनापूर्वी ते हा प्लॅटफॉर्म वापरून बघू शकतील.

जुलै ३०, २०२२ पर्यंत लागू असणा-या ‘इन्फिनिटी लर्न फेस्टिवल’चे उद्दिष्ट हा महोत्सव मोठ्या प्रमाणावर घेऊन इन्फिनिटी लर्नचा पूर्वीपासून अस्तित्वात असलेला पोर्टफोलिओ अधिक वाढवणे हे आहे. सर्वांगीण अध्ययन अनुभवासाठी जास्तीचे प्रयत्न करून महोत्सवाने यात जिवंतपणा आणला आहे. इन्फिनिटी लर्न फेस्टिवलमध्ये केवळ स्वयंअध्ययनाचाच समावेश नाही, तर यात अनेक प्रकारच्या लाइव्ह अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे अभ्यासक्रम मर्यादित काळासाठी, आत्तापर्यंत कधीच नव्हते एवढ्या कमी दरांत, उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या मोठ्या समूहाच्या गरजांची पूर्तता करण्याची कल्पना डोक्यात ठेवून, शिकण्याबद्दलचे प्रेम, चौकसता जिवंत ठेवणे आणि जागतिक दर्जाच्या आशयाचा उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानात्मक सोल्युशन्सशी मेळ घालून  विद्यार्थ्यांच्या शिकण्याची पद्धत बदलून टाकण्याप्रती असलेली इन्फिनिटी लर्नची वचनबद्धता, हे सगळे या महोत्सवात साजरे केले जाणार आहे.

इन्फिनिटी लर्नचे सीईओ व अध्यक्ष उज्ज्वल सिंग म्हणाले, “आपल्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य शिक्षण पुरवण्याच्या तत्त्वावर इन्फिनिटी लर्न काम करते. सर्वांच्या अध्ययनविषयक गरजा वेगळ्या असतात आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते आम्ही करतो. आमच्या संरचनात्मक प्रक्रिया आमच्या शिक्षकांना उत्तम अध्यापन करण्यास मदत करतील व विद्यार्थ्यांना आवडेल अशा अध्ययनाची संधी देतील याची खात्री आम्ही करतो. इन्फिनिटी लर्न फेस्टिवलच्या माध्यमातून, परवडण्याजोग्या दरात शिक्षण उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचा प्लॅटफॉर्म माहीत करून घेण्याची तसेच उत्तम अध्यापनाचा अनुभव घेण्याची संधी आम्ही त्यांना देत आहोत.”


Back to top button
Don`t copy text!