
दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । फलटण । फलटणमध्ये पारंपरिक पद्धतीने अअक्षयतृतीयेच्या आदल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येत असते. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व रमजान ईद एकाच दिवशी आल्याने याचे औचित्य साधून माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या वतीने मलठण येथील माजी खासदार लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मलठण परिसरातील हिंदू – मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, राजाभाऊ नागटिळे, बबलू पवार, जावेद शेख, कादर भाई पठाण, रज्जुभाई बागवान, नितीन जगताप, योगेश कांबळे, मंगेश खंदारे, सूरज तांदळे, रामभाऊ भोसले, आनंद वणवे, ओंकार गायकवाड, दीपक मोरे, प्रदीप गोडसे , रवि पवार गणेश बनसोडे, अक्षय कूचेकर, हभप केशवराव जाधव, श्री काटकर, श्री घनवट, किशोर गोडसे, दादासाहेब भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.