माझी वसुंधरा अभियानांतर्गत ८ फेब्रुवारीला कोळकी येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. ०५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत कोळकी व ब्रिलियंट हेल्थ अ‍ॅण्ड अ‍ॅग्री संस्था व सखी महिला कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.०० वाजता भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

ग्रामपंचायत कोळकी येथे होणार्‍या या रांगोळी स्पर्धेत महिला व मुली सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, वसुंधरा तसेच सामाजिक विषय असावेत. स्पर्धेत रांगोळी स्वत:ची आणावी. रांगोळी स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी सायंकाळी ६.०० वाजता दिला जाईल व त्याचवेळी बक्षीसही देण्यात येतील. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. नीलम देशमुख काम पाहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस मोत्यांची चिंचपेटी, द्वितीय वन ग्राम नेकलेस, तृतीय बिटर, चौथे पैठणी, पाचवे पैठणी, सहावे प्रेशर कुकर, सातवे इडली भांडे व उत्तेजनार्थ व्हेजिटेबल ट्रे अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून नावनोंदणी केलेल्या पहिल्या १०० महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी स्वाती जठार (मो. ९९७००८७८६९), संगीता जामदार (९११२८७५९९०), उमा लिपारे (८६००३७८३३५), शारदा नामदास (९७६६२१४१०४), रोशनी दंडिले (९८९०२५५४०२), माधुरी पवार (९०७५६५०८१५), सुप्रिया जाधव (९१७५५४३२५६), आशालता पिसे (७६६६७६२१०६), रेश्मा मिरगे (८७६७५०४०३७), उज्ज्वला डफळ (७६६६८८६७८३), अर्चना कांबळे (९९७५४७३७४७), लता जाधव (७३८७२२२३५३) यांच्याशी संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!