क्रेडाई, फलटणच्या माध्यमातून किल्ले स्पर्धांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण दि.१: क्रेडाई या बांधकाम क्षेत्रातील संस्थेच्या फलटण शाखेच्या माध्यमातून दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून फलटण शहरातील इच्छुकांनी 50 रुपये प्रवेश फी भरुन नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 3 हजार रुपये रोख व सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकास 2 हजार रुपये रोख व सन्मानपत्र आणि तृतीय क्रमांकास 1 हजार रुपये रोख व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

दि. 10 नोव्हेंबर पर्यंत 1) श्रीराम टॉवर्स, शिंगणापूर रोड, कोळकी, 2) कोणार्क, रिंग रोड, लाकडी चौक, फलटण, 3) आर्किटेक्ट महेंद्र जाधव, अमर प्लाझा, फलटण, 4) स्वरा बिल्डर्स डेव्हलपर्स, मारवाड पेठ, फलटण, 5) यश कन्सट्रक्शन, प्रगती टॉवर, रविवार पेठ फलटण येथे प्रवेश फी भरुन नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी महेंद्र जाधव 9822458582 यांच्याशी संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!