दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । फलटण । एकात्मिक फलोत्पादन विकास 2021-22 अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय कृषि अधिकारी भास्कर कोळेकर यांनी दिली.
या प्रशिक्षणामध्ये फळबाग,भाजीपाला, फुले लागवड, फळबाग व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, एकात्मिक किड-रोग व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन,कृषी पर्यटन बाबत अहमदनगर, पुणे व नाशिक विभागातील कृषि संशोधन केंद्र, कृषि विद्यापिठे, प्रगतशील शेतकरी यांच्या प्रक्षेत्रावर भेटीचे नियोजित करण्यात आले आहे. फलटण व माण तालुक्यातून प्रत्येकी 20 शेतकरी प्रमाणे लक्षांक प्राप्त आहे.
तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 2 डिसेंबर 2021 पर्यत अर्ज भरुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.