इमॅजिनएक्सपीद्वारे ‘एज्युकेशन काउन्सिलिंग मेळाव्या’चे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ०१ : विद्यापीठांशी जोडलेल्या आणि भागीदारीतील फ्युचर स्किल डिग्री प्रोग्रामचे भारतातील आघाडीचे प्रदाते इमॅजिनएक्सपीने भारतातील पहिला व्हर्चुअल ईसीएम (एज्युकेशन काउन्सिलिंग मेळावा) २०२१ लाँच केला आहे. भविष्यातील कौशल्यांमध्ये आकर्षक करिअरच्या संधी शोधणे तसेच या कौशल्यांसाठी उपलब्ध डिग्री प्रोग्राम शोधण्यासाठी लाखो भारतीयांना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास इच्छुकांना मार्गदर्शन आणि सल्ला देण्याची मोहिम या कार्यक्रमाअंतर्गत घेतली जाईल.

देशभरातील ८० पेक्षा जास्त कॉर्पोरेट्स, १००+ इंडस्ट्री एक्सपर्ट, रिक्रूटर्स, स्टार्टअप संस्थापक, पॉलिसी मेकर्स आणि देशातील ३०+ विद्यापठांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी करिअर, रिक्रूटर्सच्या अपेक्षा, पदवी आणि इंडस्ट्रीत महत्त्व असलेली कौशल्ये आणि महामारीचा जॉब मार्केटवरील परिणाम यासंबंधी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची एक मोठी पर्वणी आहे. या संधीचा लाभ ३० जून २०२१ पर्यंत दर बुधवार, शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ५.०० वाजेनंतर व्हर्च्युअली घेता येईल.

इमॅजिनएक्सपीचे महासंचालक प्रोफ (कर्नल) शिशिर कुमार याविषयी बोलताना म्हणाले, “ मेक इन इंडिया आणि भारताला ५ ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या मोहिमेला आमचा पाठींबा आहे. यासाठी डिजिटल अर्थव्यवस्थेकरिता आवश्यक असलेल्या भविष्यातील कौशल्यांसाठी आपले तरुण तयार असणे आवश्यक आहेत. तरुण इच्छुकांना तसेच त्यांना पालकांना सध्या उपलब्ध असलेल्या मोठ्या संधींचा शोध घेणे तसेच शिक्षण व पदवी निवडण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. याद्वारे त्यांचे करिअर दीर्घकाळासाठी लाभकारक ठरेल. आमचे उद्दिष्ट असे आहे की, विद्यार्थ्यांना तज्ञ, रिक्रूटर्स, विद्यापीठे, फॅकल्टी आणि विद्यार्थ्यांमार्फत योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन प्रदान करणे.”

२०१९ मध्ये, फ्युचर स्किलची कमतरता असल्याने भारतीय उद्योगांना उमेदवार घेता आले नाही. युएक्स डिझाइन, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, हेल्थ टेक, फिनटेक, आरपीए, डाटा सायन्स, आयओटी, सायबर सिक्युरिटी आणि इतर अनेक आधुनिक डिजिटल अर्थव्यवस्थेत आवश्यक असलेल्या प्रवाहांमध्ये इमॅजिनएक्सपी व्हर्चुअल ईसीएम विद्यार्थ्यांना फ्युचर स्किल डिग्री प्रोग्राम शोधण्यासाठी मदत करेल.


Back to top button
Don`t copy text!