
स्थैर्य, सातारा दि. 2 : महिला बचत गटातील महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ (माविम) सातारा कार्यालयामार्फत ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी कुंदन शिनगारे यांनी दिली आहे.
ज्या महिला या स्पर्धेत भाग घेणार आहेत त्यांनी नाविण्यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच काही एैतिहासिक मूल्य असणारा दीड ते तीन मिटानांचा उखाण्याचा व्हिडीओ तयार करुन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सातारा कार्यालयाकडे 10 सप्टेंबरपर्यंत satara.mavim1@gmail.com या ईमेल पत्तयावर पाठवावीत, असेही आवाहन श्री. शिनगारे यांनी केले आहे.