नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | फलटण | फलटण नगर परिषदेचे आरोग्य विभाग सभापती नगरसेवक सनी अहिवळे यांच्या 38 वा वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन (नवीन समाज मंदिर) मंगळवार पेठ फलटण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती नगरसेवक सनी अहिवळे मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ नगरसेवका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, राहुल निंबाळकर, सनी काकडे, हरीश काकडे (आप्पा), सिद्धांत अहिवळे, संग्राम अहिवळे, प्रशांत अहिवळे, मंगेश जगताप (वस्ताद) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

फलटण बल्ड बॅंकेत रक्ताचा तीव्र तुटवडा असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन बल्ड बॅंकेच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यामुळेच नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सनी अहिवळे मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आलेल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!