दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । फलटण । लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन आणि एन. एस. ग्रुप फलटण यांच्या संयुक्त विद्यमानाने 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने रविवार 6 मार्च 2022 रोजी अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे महिलांसाठी सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेचे नियम याप्रमाणे – या स्पर्धेमध्ये दोन गट असतील. गट नंबर 1. वय वर्ष 18 ते 30 अविवाहित मुली (मिस फलटण)
गट नंबर-2 वय वर्ष 21 च्या पुढील सर्व विवाहित महिला (मिसेस फलटण)
या स्पर्धेमध्ये पुढील तीन फेर्या असतील. वेशभूषा, केशभूषा, चालणे, आणि ओळख, त्याचबरोबर कला सादरीकरण (नृत्य संगीत विविध कला) यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकाने आणावयाचे तसेच प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
सौंदर्य स्पर्धा या महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धा म्हणजे केवळ सौंदर्यावर आधारीत नसतात, तर इथे बुद्धीमत्तेचाही कस लागतो. आजकाल रंग, वय असे निकष खूप बदलले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे सौंदर्य स्पर्धा या महिलांसाठी उत्तम व्यासपीठ आहेत, असे मत सौ. संध्याताई गायकवाड ,(लायन्स क्लब ऑफ फलटण सदस्य) यांनी व्यक्त केले.
तरी फलटण तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा असे आव्हान लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन व एन. एस. ग्रुप फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी सौ. सुनीता कदम, सौ. उज्वला निंबाळकर, सौ. सविता कापडी, सोनाली गुंजवटे,9272125123, 7821824809, 9890923485, 8097101112 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.