फलटण आगारामार्फत दर श्रावणी सोमवारी ‘अष्टविनायक दर्शन यात्रा’ सहलीचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग व फलटण आगारामार्फत खास श्रावणी सोमवारनिमित्त भक्तांसाठी ‘अष्टविनायक दर्शन यात्रा’ आयोजित केली आहे. या सहलीचा तिकिट दर प्रति प्रवासी रू. १५००/- असून प्रवाशांनी या सहलीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रक प्रमोद साळुंखे यांनी केले आहे.

ही सहल दर श्रावणी सोमवारी पहाटे ५.०० वाजता फलटण बसस्थानकावरून निघेल व दुसर्‍या दिवशी रात्री १०.०० वाजता फलटण येथे परत येईल. या सहलीचा प्रवास मार्ग मोरगाव, सिध्दटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव असा राहील.

सहलीदरम्यान ओझर येथे मुक्कामाची सोय असून ओझर संस्थानची रूपये ३० जेवणाचे व रूपये ३० राहण्याची सोय आहे. ही कॉमन हॉलची सुविधा आहे. ‘नॉन एसी’ २५० रूपये व एसी ५०० रूपये राहील. हॉलमध्ये अंथरण्याची गादी संस्थानकडून मिळेल व पांघरण्यासाठी स्वत:ची व्यवस्था करावी.

जास्तीत जास्त भक्तांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण आगारामार्फत करण्यात आले आहे. आगारमार्फत सध्या विविध पॅकेज सहलींचे आयोजन करण्यात येत आहे.

बुकिंगसाठी वाहतूक नियंत्रक श्री. प्रमोद साळुंखे, मोबा. ९१५८७३५१५१ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रवाशांनी एसटी बसचाच वापर करावा. एसटीचा प्रवास म्हणजे विमा रूपये १० लाख तसेच एसटीचा प्रवास म्हणजे सुखरूप प्रवास, सुरक्षित प्रवास असतो, असे आवाहन फलटण आगारामार्फत भक्तगणांना करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!