
स्थैर्य, सातारा दि. 10 : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यामध्ये बेरोजगार उमेदवारांकरिता दि. 15,16, व 17 जुलै 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रार्दुभावामुळे सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामगार स्थलांतरीत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सदरच्या उद्योगांना मनुष्यबळ भासू शकते. त्याकरिता सर्व उद्योग, आस्थापना यांनी दि 15 जुलै च्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन सचिन जाधव सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,सातारा यांनी केले आहे.
कौशल्य विकास विभागाच्या महास्वयम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचित करुन इच्छूक उमेदवारांचे प्रोफाईल डाऊनलोड करुन घ्यावे व नियुक्तीबाबतची पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. या वेबपोर्टलचा वापर करुन सूक्ष्म,लुघ मध्यम व मोठे उद्योग सर्व शासकीय व खाजगी आस्थापना विनामुल्य कुशल / अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन घेऊ शकतात.
तसेच नोकरी इच्छूक उमेदवारांनी देखील ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध रिक्त पदांना ऑनलाईन ॲप्लाय करावे. उद्योजकांकडून उमेदवारांच्या मुलाखती टेलिफोन अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा येथे प्रत्यक्ष अथवा 02162 – 239938 या दुरुध्वनीवर अथवा [email protected] या ईमेल वर संपर्क साधावा. जास्तीत जास्त उद्योजक, उमेदवार यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहनही सचिन जाधव यांनी केले आहे.