
दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२३ | फलटण |
भावेनगर (पिंपोडे बु.), ता. कोरेगाव येथे श्री घुमाईदेवी क्रिकेट क्लब भावेनगर यांच्याकडून २३ मार्च ते २६ मार्चदरम्यान ‘आमदार चषक’ भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा श्री घुमाईदेवी रोड, भावेनगर येथे संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास आमदार दीपकराव चव्हाण यांच्याकडून रोख रुपये १५००१/- व कै. शिवाजी सावळा येळे (फौजी) यांच्याकडून चषक प्रदान करण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकास श्री घुमाईदेवी क्रेशरकडून रोख १०००१/- रुपये व उपसरपंच कै. सुरेश जिजाबा येळे यांच्याकडून चषक, तृतीय क्रमांकास सरपंच सौ. रेश्मा गंगाराम येळे व उपसरपंच श्री. राजाराम आबाजी दगडे यांच्याकडून रोख ७००१/- व कै. जिजाबा महादेव येळे यांच्याकडून चषक, चतुर्थ क्रमांकास श्री. विनायक नामदेव येळे यांच्याकडून रोख ५००१/- रुपये व युवा नेतृत्व श्री. तात्याबा मारुती येळे यांच्याकडून चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण स्पर्धेतील आदर्श संघास वरद विनायक क्रेशर यांच्याकडून रोख रुपये ५००१/- देण्यात येणार आहेत. याशिवाय विकेट हॅट्ट्रीक घेणार्यास सचिन येळे यांच्याकडून ५०१ रुपये देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी १२००/- रुपये बॉलसह असणार आहे. स्पर्धा नियम व अटींनुसार खेळवल्या जाणार असून प्रथम ३२ संघांना प्राधान्य दिले जाईल.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी आयोजक चैतन्य येळे (मोबा. ९१३७५७७४८१), उत्तम कोकरे (९७६६६६५४८०), सागर येळे (७८७५७०७३६८) व शिवाजी येळे (९७६३२२०७१७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.