जोशी हॉस्पिटलच्या वतीने “आपली फलटण मॅरेथोन २०२२” चे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । फलटण । जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर , फलटणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन बुधवार दि. 12 आक्टोंबर रोजी सकाळी 6 वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दि. १२ आक्टोबर रोजी जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जोशी हास्पिटल ७ वर्षापासून अनोख्या व आगळ्या वेगळ्या पध्दतीने हा दिन साजरा करत आहे. कोरोना महामारी मुळे मागील दोन वर्षे कुठलेच कार्यक्रम घेता आले नाहीत. त्यामुळे या वर्षी अधिक जोमाने हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा करूयात असे डॉ प्रसाद जोशी यांनी आवाहन केले आहे .

मानवी जीवन आनंदी व समाधानी असावे त्यासाठी निरोगी मनाची आणि निरोगी मनाच्या वास्तव्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असून देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढीला समजावून घेवून त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे हे सामाजिक कर्तव्य असून जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन कार्यक्रम हा त्यादृष्टीने खारीचा वाटा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले.

25 ते 45 वर्षे वयोगटातील सर्वाना व्यायामाचे महत्त्व समजावून देणे व प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेल्या २२ वर्षांपासून फलटण येथे कार्यरत असताना अस्थिरोग उपचार, सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि मणक्यांवरील शस्त्रक्रिया करून अविरत उपचार देणे चालूच आहे . सदरचे पेशंट आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने सर्वांनी एकत्र येवून दि. 12 आक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी सार्वांना केले आहे.

दि. 12 आक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजता सजाई गार्डन फलटण येथून 10 कि.मी. मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. सकाळी 6. 30 वाजता सजाई गार्डन येथून 5 कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सकाळी 7 वाजता 3 कि. मी. वाकेथान (जलद चालणे) स्पर्धा सुरू होणार आहे.

मॅरेथॉन स्पर्धेत 5 ते 10 कि. मी. मध्ये सळसळता युवा गट(२५ ते ४५ वय वर्षे – पुरुष आणि महिला वेगळा गट ) व प्रगल्भ प्रौढ गट (४६ ते ६५वय वर्षे – पुरुष आणि महिला वेगळा गट) व
अनुभवी जेष्ठ(६५+) वयोगटासाठी 3 कि. मी. जलद चालणे असे विभाग करण्यात आले आहेत.

सकाळी 9 वाजता सजाई गार्डन कार्यालयामध्ये सर्वांचे स्वागत व अल्पोपहार, सकाळी १०.३० वाजल्यापासून मुख्य कार्यक्रम सुरु होणार असून दुपारी 1 वाजता भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
सजाई गार्डन कार्यालयामधील कार्यक्रमासाठी प्रवेश पास आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी दि. २५ सप्टेंबर पर्यंत आनलाईन नोंदणी
joshihospitalpvtltd.com या वेब साईट वर करता येणार आहे .
प्रवेश शुल्क ३००/- फक्त आहे.

ज्येष्ठ नागरिक यांना कोणतीही फी आकारली जाणार नसल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.
९,१०आणि ११ ऑक्टोबर या तीनही तारखेला सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत ₹३००/- भरून marathon चे किट घेऊन जावे की ज्यामध्ये T Shirt, Runner BIB, टोपी आणि एक आकर्षक गिफ्ट मिळेल.

तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जोशी हॉस्पिटल प्रा. ली, फलटण तर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!