
दैनिक स्थैर्य । दि. ०४ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ज्या विदयार्थ्यांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा यांचेकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळणेकामी प्रस्ताव सादर केलेले आहेत, व ज्या विदयार्थ्यांच्या अर्जांना त्रुटी लागलेल्या आहेत अशा सर्व विदयार्थ्यांना समितीकडून पत्राद्वारे, एसएमएसद्वारे, नोटीसीअन्वये कळविण्यात आलेले आहेत अशा विदयार्थ्यांसाठी दि. 4 व 5 नोव्हेंबर रोजी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा येथे प्रलंबित प्रकरणांवर त्रुटीपुर्तता करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
संबधित विदयार्थ्यांनी, पालकांनी आवश्यक त्या सर्व मुळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन, सातारा जिल्हा जातीप्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्रीमती स्वाती इथापे यांनी केले आहे.