
दैनिक स्थैर्य | दि. 23 जुलै 2025 । कोळकी । येथे जलशुद्धीकरण केंद्रावर सोलर प्रकल्पाचे भूमिपूजनासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आज बुधवार दि. २३ रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी कोळकी ग्रामपंचायतीच्या आवारात जाहीर सभा संपन्न होणार आहे, अशी माहिती कोळकी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. अपर्णा विक्रम पखाले व उपसरपंच डॉ. अशोक नाळे यांनी दिली आहे.
कोळकी ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन समारंभाची माहिती देताना कोळकी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. अपर्णा विक्रम पखाले व उपसरपंच डॉ. अशोक नाळे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे संचालक अक्षय गायकवाड, युवा नेते विक्रम पखाले यांची उपस्थिती होती.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कोळकी गावचे सर्वेसर्वा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून कोळकी गावामध्ये विकासकामे कधीही थांबली नव्हती व यापुढे सुद्धा थांबणार नाहीत. बुधवार दि. २३ रोजी संपन्न होत असलेल्या कार्यक्रमास माजी आमदार दिपकराव चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व कोळकीचे सर्वेसर्वा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी कोळकी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करत असताना कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती सुद्धा यावेळी सरपंच सौ. अपर्णा विक्रम पखाले व डॉ. अशोक नाळे यांनी दिली आहे.