मोटार अपघात प्रकरणातील जखमींना दिव्यांगाचे प्रमाणपत्राबाबत शिबीराचे आयोजन


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । सातारा । प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यावतीने विधी सेवा सदन येथे मोटार अपघात प्रकरणामधील जखमींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश पी.पी. अभग, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ए.एस. जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव उपस्थित होत्या.

विधीज्ञांनी सहकार्य करुन जास्तीत जासत दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!