दक्षता जनजागृती सप्ताहा निमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सरदार वल्लभाई पटेल यांच्या दि.31 ऑक्टोंबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे 31 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली आहे.

सोमवार दि. 31 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शासकीय, निमशासकीय विभागाचे प्रमुख व त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत भ्रष्टाचार निर्मुलन शपथ ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या सप्ताहात जनजागृती विषयाचे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून मंगळवार दि.1 नोव्हेंबर 2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुजय घाटगे हे आकाशवाणी, सातारा केंद्रावर मुलाखत देणार आहेत. तसेच लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने विविध गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा येथे महाविद्यालयींन तरुणांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्याच्या दृष्टीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

सातारा, कराड, फलटण, पाटण, कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा, वडूज, दहिवडी, या तालुक्याच्या ठिकाणी तसेच जिल्ह्यातील नगरपालिका व मोठमोठ्या बाजारपेठा या ठिकाणी मुख्य चौकात लोकांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्याच्या दृष्टीने पोस्टर्स लावणे तसेच पत्रके वाटण्यात येणार आहेत.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक नागरीक आपल्यापरीने योगदान देवू शकतो. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन       श्री. घाटगे यांनी केले आहे.

टोल फ्री क्रमांक-1064

ॲन्टी करप्शन ब्युरोज, सातारा दूरध्वनी क्रमांक-02162-238139

ई-मेल आयडी-dyspacbsatara@gmail.com, dyspacbsatara@mahapolice.gov.in

संकेतस्थळ – www.acbmaharashtra.gov.in

फेसबुक- www.facebook.com/Maharashtra ACB

मोबाईल ॲप- www.acbmaharashtra.net

ट्विटर – ACB_Maharashtra

संपर्कासाठी पत्ता- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा 524 अ सदर बझार, जिल्हा न्यायालयासमोर, सातारा.


Back to top button
Don`t copy text!