दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२२ । सातारा । सत्यशोधक समाजाचा वारसा पुढे चालवत असताना फुले-शाहू -आंबेडकरांचा वारसा घेऊन रयत शिक्षण संस्था कार्य करीत आहे.’ उपेक्षित वंचित समाजाच्या दारी ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचे काम करत शिक्षण संस्था करीत आहे.’ रयत शिक्षण संस्थेला एक त्यागी वारसा आहे’. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले अध्यापक विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरण समारंभ साजरा झाला आला.
या समारंभाचे प्रमुख अतिथी सविता कणसे आपल्या मनोगतात म्हणाल्या रयत शिक्षण संस्थेच्या या गुणात्मक आणि संख्यात्मक विस्तारामध्ये पवारसाहेबांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची सोय निर्माण व्हावी यासाठी अनेक शाखा सुरू केल्या नुसत्या शाखा सुरू न करता प्रत्येक शाखेमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ते सतत आग्रही राहिले. वयाच्या 82 व्या वर्षीसुद्धा तरुणांना लाजवेल असे काम पवारसाहेब यांनी केले आहे. या समारंभाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्यावतीने कृतज्ञता सप्ताह आयोजित केलेला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी उपेक्षित समाजाच दारी ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवण्याची महान कार्य केलेले आहे. रयत शिक्षण संस्थेबरोबर संपूर्ण भारत देशात कला, साहित्य, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात पवार साहेबांचे योगदान अमूल्य आहे प्रमुख अतिथी सविता कणसे मॅडम यांनी पवार साहेबांच्या बालपणाचे प्राथमिक शिक्षणाचे अनेक किस्से आठवणी यानिमित्ताने सांगितल्या सतत कार्यमग्न असणारा हा माणूस प्रत्येकाचा आयडॉल असले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कृतज्ञता समारंभाच्या निमित्ताने वक्तृत्व आणि निबंध, चित्रकला, सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत उज्ज्वल यश मिळालेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विभागीय गीतगायन स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल मृदुला बेलोशे हिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य उदयकुमार सांगळे यांनी रयत शिक्षण संस्थेत अनेक उपक्रम त्यांची अंमलबजावणी कशी प्रभावी होते. याविषयी आपले मत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. प्रदीप हिवरकर यांनी केले प्रा. रवींद्र घाटगे, प्रा.सोमनाथ शिंगाडे, डॉ. दादासाहेब नवले, ज्योती शिंदे उपस्थित होते. प्रमाणपत्र वितरण निवेदन सुहानी जाधव व प्रमुख अतिथी परिचय दिशा पळसे यांनी केले. सूत्रसंचालन सुषमा
जगदाळे व आफ्रीन मुल्ला तर आभार श्वेता जगताप यांनी व्यक्त केले.