टीसीएल कनेक्ट डिलर्स मीट २०२२ चे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । मुंबई । आपला विद्यमान पुरस्कार-प्राप्त व नेक्स्ट-जनरेशन उत्पादन पोर्टफोलिओ विस्तारित करण्याच्या दिशेने प्रबळ पाऊल उचलत टीसीएल या जागतिक पहिल्या क्रमांकाच्या अँड्रॉईड स्मार्ट टीव्ही ब्रॅण्डने पुन्हा एकदा भागधारकांना एकत्र आणण्यासाठी सर्वसमावेशक इव्हेण्टचे आयोजन केले. नुकतेच कंपनीने कोर्टयार्ड बाय मेरिएट नाशिक येथे विशेष डिलर्स मीट “टीसीएल कनेक्ट २०२२”चे आयोजन केले. नाशिकमधील उच्चस्तरीय डिलर्स मीटमध्ये टीव्ही, एसी व डब्ल्यूएम श्रेणीमधील आधुनिक तंत्रज्ञान नवोन्मेष्कारांना सादर करण्यात आले. या इव्हेण्टला डिलर्स व टेक्निशियन्ससोबत १५० हून अधिक जणांनी उपस्थिती दाखवली.

टीसीएल इंडियाचे मार्केटिंग प्रमुख विजय कुमार मिक्किलीनेनी म्हणाले, “आम्हाला टीसीएल कनेक्टचे आणखी एक सत्र आयोजित करण्याचा आनंद होत आहे. स्मार्ट एअर कंडिशनर्सची आमची २०२२ एसी श्रेणी, भावी टीव्ही नवोन्मेष्कार आणि अपग्रेडेड डब्ल्यूएमची ओळख करून घेण्यासाठी या इव्हेण्टला आमचे निष्ठावान ट्रेड सहयोगी, क्लायण्ट्स व टेक्निशियन्स उपस्थित होते. या इव्हेण्टदरम्यान आम्ही भावी, उच्च दर्जाची एआय*आयओटी होम टेक्नोलॉजी आणि नुकेतच लाँच केलेल्या उत्पादन नवोन्मेष्कारांप्रती आमच्या दृष्टीकोनाचे अनावरण केले. आम्ही आमच्या आगामी नवीन श्रेणीची झलक देखील दाखवली, जी कदाचित विद्यमान बाजारपेठ स्थितीमध्ये पूर्णत: क्रांतिकारी बदल घडवून आणेल.”

टीव्ही नवोन्मेष्कारी विभागांतर्गत टीसीएल कनेक्टने प्रामुख्याने नवीन लाँच केलेल्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले- जसे टीसीएल सी८३५, टीसीएल सी८२५, टीसीएल सी६३५, टीसीएल सी७२५, टीसीएल पी७३५, टीसीएल पी६१५, टीसीएल पी७२७, टीसीएल एसएस२०० आणि टीसीएल एसएस२०१. खरेतर टीसीएल प्रतिनिधींनी नवीन लाँच करण्यात आलेल्या तीन टीव्ही मॉडेल्सची सर्वसमावेशक माहिती दिली. ते तीन टीव्ही मॉडेल्स आहेत- १४४ हर्टझ व्हीआरआर असलेला गेमिंग मिनी एलईडी ४के गुगल टीव्ही सी८३.५, अॅक्शन सिनेमा क्यूएलईडी ४के टीव्ही सी६३५ आणि ४के एचडीआर गुगल टीव्ही पी७३५. हे टीव्ही डिवाईसेस उच्च-प्रगत तंत्रज्ञानांचे सर्वांगीण पॅकेज आहेत, जे डेट नाइट्सपासून फॅमिली गेट-टूगेदर्स, अने‍क मनोरंजनाचा आनंद देतात.

या टीव्हींमध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्ये व तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत वैशिष्ट्ये आहेत- जसे मिनी एलईडी, क्यूएलईडी, आयमॅक्स एन्हान्स्ड, डॉल्बी व्हिजन आयक्यू, एमईएमसी एचडीआर १०+, ४के व एआयपीक्यू इंजिन, डॉल्बी अॅटमॉस, ऑनक्यो साऊंड सिस्टिम, १४४ हर्ट्झ व्हीआरआर, गेम बार, एमिंग एड आणि एएलएलएम. हे टीव्ही नवोन्मेष्कार ग्राहकांनी यापूर्वी पाहिलेले नाहीत. तसेच या टीव्हींमध्ये गुगल टीव्ही, एचडीएमआय, यूएसबी कनेक्टीव्हीटी, हँड्स-फ्री कंट्रोल आणि निवडक मॉडेल्समध्ये व्हिडिओ कॉल कॅमेरा सुविधा देखील आहेत.

स्मार्ट एसी मॉडेल्ससंदर्भात टीसीएल कनेक्टने १.५ टन ४ स्‍टार आणि १ टन ५ स्‍टार मॉडेल्सवर लक्ष केंद्रित केले. एसीची अविश्वसनीय श्रेणी लो-पॉवर इम्पॅक्टसाठी कमी जीडब्ल्यूपीसह येते. या संपूर्ण इव्हेण्टचा तिसरा हिरो विभाग वॉशिंग मशिन होता. या विभागांतर्गत डिलर्सचे लक्ष वेधून घेतलेली उत्पादने होती ८ किग्रॅ फ्रण्ट लोड, ८.५ किग्रॅ फ्रण्ट लोड, ६.५ किग्रॅ एसएम, ८.५ किग्रॅ एसएम आणि ९.५ एचजी एसएम.

मागील पाच वर्षांपासून टीसीएलने भारतीय परिसंस्थेमधील त्यांच्या अनपेक्षित यशस्वी प्रवासाचा प्रचंड आनंद घेतला आहे. टीसीएल कनेक्ट सारखे उपक्रम ब्रॅण्ड दृष्टीकोनाच्या मोठ्या ध्येयाचा भाग आहेत. ते अंतिम ग्राहकांना अद्वितीय दर्जा, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम अनुभव देण्यासोबत ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्स विभागातील उद्योग अग्रणी म्हणून स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात.


Back to top button
Don`t copy text!