दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । ३३ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो – खो स्पर्धेचे फलटण येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी फलटण येथे निवास, भोजन व इतर सर्व व्यवस्थेचे सर्वोत्कृष्ट नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये आयोजित बैठकित श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, सातारा जिल्हा खो – खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष मनोहर यादव, कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण संघटना अध्यक्ष आर. वाय. जाधव, सांगली जिल्हा खो – खो क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार, जिल्हा खो – खो संघाचे उपाध्यक्ष नितीन भोसले, दादासाहेब चोरमले, जिल्हा खो – खो संघाचे सदस्य अमरसिंह देशमूख, जिल्हा खो – खो संघाचे सदस्य दिलीप शिंदे, जेष्ठ खो – खो खेळाडू नजीरभाई शेख, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबासाहेब गंगवणे, मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, मुधोजी हायस्कूलचे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे ट, जेष्ठ नेते भिमदेव बुरुंगले, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत शिवाजीराजे नाईक निबाळकर पतसंस्था जगन्नाथ उर्फ भाऊसोा कापसे, श्रीमंत रामराजे युवा मंचचे संस्थापक राहुल निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटणला ३३ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो – खो स्पर्धेचे नियोजन करताना खेळाडूंसह इतर सर्वच शिक्षक, पदाधिकारी व अधिकार्यांच्या भोजन व निवास व्यवस्था काटेकोर करणे गरजेचे आहे. त्यामध्ये कोणतीही तृटी राहुन चालणार नाही. फलटणला कोणाचाही गैरसोय होवू न देणे यावर आपण सर्वांनी भर दिला पाहिजे, असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
खो – खो स्पर्धा व फलटण हे एक समीकरण आहे. फलटणला खो – खोचे अतिशय उत्कृष्ट नियोजन नेहमीच करण्यात येत आहे. जे मान्यवर समितीमध्ये कार्यरत राहणार आहेत, त्यांनी त्यांचे चोखपणे कामगिरी बजावणे गरजेचे आहे. क्रीडांगणाची जी बाजु असते ती खेळात महत्त्वाची असते. त्याचे शिक्षण हे मला फलटणला स्व. पी. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. फलटणला होणारी ही स्पर्धा ही न भुतो, न भविष्य अशीच झाली पाहिजे. खो – खो हा आता सातासमुद्रापार गेलेला आहे. निसर्गात जे बदल होत आहेत त्यानुसार ज्यांचा अभ्यास आहे त्यांचा समावेश सुध्दा कमिटीत करावा, असे मत सांगली येथील खो – खो मार्गदर्शक प्रशांत पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी क्रीडांगण समिती, स्टेज समिती, उद्घाटन – बक्षीस – वितरण व समारोप समिती, निवास समिती, पंच व अधिकारी निवास व्यवस्था समिती, वाहतुक समिती, भोजन व्यवस्था समिती, प्रथमोपचार समिती, सुरक्षा समिती, मार्चपास फ्लॅग होस्टिंग समिती, तांत्रिक समिती, निमंत्रण समिती, पाणी व्यवस्था समिती, रेकोर्ड समिती, स्टॉल समिती, निरिक्षण व स्वच्छता समिती, स्वागत समिती व प्रसिद्धी समितीचे गठण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले आहे.
बैठकीनंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, खो – खो संघटनेचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक व इतर मान्यवरांनी आमदार स्व. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकूल येथे जाऊन क्रीडांगणाची पाहाणी केली.