दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२३ | फलटण |
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा व माऊली फाउंडेशन यांच्या वतीने ‘गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी’ कार्यक्रमाचे आयोजन दि. १२, १३ व १४ मे रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा एक प्रयत्न असल्याचं एका पत्रकाद्वारे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व माऊली फाउंडेशनचे संस्थापक अनुप शहा यांनी सांगितले आहे.
या उपक्रमाद्वारे महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असून करमणुकीसाठी ‘होम मिनिस्टर’, लावणी, फलटणमधील कलाकारांचे नृत्य इ. कार्यक्रमांसह रोज ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. याचबरोबर पाक कला, मेहंदी कला व रांगोळी स्पर्धाचे आयोजनही करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना व स्पर्धेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला बक्षीस देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अनुप शहा (मोबा. नं. 968941008) यांच्याशी संपर्क साधावा, अशी विनंती एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.