
दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
तांबवे (ता. फलटण) येथील श्री भैरवनाथ गणेशोत्सव तरुण मंडळाने भव्य असा ‘गणेशोत्सव सोहळा २०२४’ आयोजित केला आहे. या सोहळ्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल असून भाविकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकार्यांनी केले आहे.
कार्यक्रमांची रुपरेषा :
शनिवार, दि. ७/९/२०२४ रोजी (दु. १२ ते ४) : श्रींचे आगमन व भव्य मिरवणूक व त्यानंतर श्रींची प्राणप्रतिष्ठापना,
रात्री ९ ते ११ निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन.
रविवार, दि. ८/९/२०२४ रोजी (रात्री ७ ते ११)
‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’.
सोमवार, दि. ९/९/२०२४ रोजी (रात्री ९ ते ११)
‘महाराष्ट्राची बुलंद तोफ’ शिवशाहीर प्रदीप महाराज नलावडे यांचे
‘गजर शिवचरित्राचा | जागर राष्ट्रधर्माचा’.
मंगळवार, दि. १०/९/२०२४ रोजी (रात्री ९ ते ११)
झी टॉकीज फेम किर्तनकार ह.भ.प. सागर महाराज बोराटे सर (नातेपुते)
बुधवार, दि. ११/९/२०२४ रोजी (रात्री ८ वा.)
लहान मुलांचे डान्स कार्यक्रम ‘बुगी – बुगी’
गुरुवार, दि. १२/९/२०२४ रोजी (सकाळी ९ ते १२)
श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद संध्याकाळी ६ वाजता.
शनिवार, दि. १४/९/२०२४ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन
रविवार, दि. १५/९/२०२४ रोजी (रात्री ९ वाजता)
वैभव म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा, कोल्हापूर
सोमवार, दि. १६/९/२०२४ रोजी (सायं. ४ वाजता)
‘श्रीं’ची भव्य विसर्जन मिरवणूक.
या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.