दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
आजच्या बदलत्या आधुनिक जीवनशैलीमध्ये मुलींची सुरक्षितता हा महत्त्वपूर्ण विषय ठरत आहे. त्याअनुषंगाने ईश्वरकृपा शिक्षण संस्था संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे येथे बदलती आधुनिक जीवनशैली आणि मुलींची सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून निंबळक केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख निकाळजे सर उपस्थित होते. या शिबिरामध्ये निकाळजे सर यांनी इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंतच्या मुलींना मार्गदर्शन केले. यामध्ये मुलींनी समाजामध्ये वावरत असताना बाळगण्याची सुरक्षितता तसेच मुलींना गुड टच, बॅड टच याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन केले.
या शिबिराचे सूत्रसंचालन पूनम जाधव यांनी केले. तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे सर यांनी केंद्रप्रमुख श्री. निकाळजे सर यांनी मुलींना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे आणि संचालक आरटीओ इन्स्पेक्टर श्री. संभाजी गावडे यांनी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल श्री. गावडे सर यांनी त्यांचे आभार मानले.
या शिबिराप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.